श्रीरामपूर | घरपोच ताजी भाजी
🌟 आमचा दृष्टिकोन व उद्देश:
श्रीरामपूरमधील प्रत्येक नागरिकाचा अमूल्य वेळ वाचावा, बाजारातील धावपळीतून सुटका व्हावी आणि शेतातील अत्यंत ताजी, फ्रेश भाजीपाला व फळे थेट बाजारापेक्षा अत्यंत स्वस्त दरात घरपोच मिळावीत, यासाठी 'AAPLE MARKET' ची स्थापना करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्राहकांना पारदर्शक आणि उच्च दर्जाची डिजिटल बाजारपेठ देण्याचा आमचा संकल्प आहे.
माहिती संकलन: आम्ही ग्राहकांचे नाव, मोबाईल नंबर, परिसर आणि पत्ता ही माहिती फक्त ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी गोळा करतो.
सुरक्षितता: ग्राहकांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असून तो कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला शेअर केला जाणार नाही.
परतावा नियम: भाजीपाला आणि फळे हे नाशवंत असल्याने एकदा पाठवलेला माल कुठेही रिटर्न (परत) घेतला जाणार नाही.
ऑर्डर रद्द: ऑर्डर एकदा व्हाट्सॲपवर कन्फर्म झाल्यानंतर ती कोणत्याही परिस्थितीत रद्द करता येणार नाही.
१. सेवा क्षेत्र: ही सेवा फक्त श्रीरामपूर शहर आणि ग्रामीण परिसरासाठी मर्यादित आहे.
२. दूध आणि ताजी भाजी नियम: दूध किंवा लवकर खराब होणाऱ्या नाशवंत मालाच्या ऑर्डरसाठी **पहिले ऑनलाईन पेमेंट (Prepaid)** करणे बंधनकारक आहे.
३. डिलिव्हरी वेळ: ग्राहकाला ऑर्डर साधारणपणे **१ तासाच्या आत** घरपोच भेटेल.
४. लेट ऑर्डर व सूट नियम: वाहतूक किंवा इतर कारणांमुळे लेट ऑर्डर झाल्यास बिलाच्या रकमेमध्ये कोणतीही सूट किंवा कपात केली जाणार नाही.
५. किमान ऑर्डर व डिलिव्हरी चार्ज: घरपोच डिलिव्हरीसाठी कंपनीने ठरवून दिलेली किमान खरेदी मर्यादा पाळणे आवश्यक आहे, अन्यथा नियमानुसार चार्ज लागेल.
६. ग्राहकाची उपस्थिती व पत्ता: डिलिव्हरी बॉय पत्त्यावर पोहोचल्यावर ग्राहकाने फोन उचलला पाहिजे व माल स्वीकारला पाहिजे. चुकीचा पत्ता किंवा फोन बंद असल्यास मालाच्या नुकसानीची सर्व जबाबदारी ग्राहकाची राहील (रि-डिलिव्हरी चार्ज लागू).
७. पावती अनिवार्य: ॲपवर ऑर्डर केल्यावर अंतिम पावती आमच्या अधिकृत व्हाट्सॲपवर पाठवणे अनिवार्य आहे.